Bus Accident
sakal
पेठ: प्रवाशांसह विद्यार्थिनींना घेऊन जाणारी पेठ आगाराची बस ( एमएच १४ बीटी ३५९८) शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पेठहून आडगावकडे भरधाव जात असताना एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने लगतच्या सागाच्या झाडासह दगडावर आदळली. यामुळे बस जागीच थांबून अनर्थ टळला असला तरी बारा मुलींना दुखापत झाली आहे.