Accident
sakal
पेठ: नाशिक- पेठ- गुजरात राष्ट्रीय महामार्गावर वांगणी गावाजवळ मंगळवारी (ता. ११) पहाटे पाचच्या सुमारास कार व ट्रकची समोरासमोर धडक होऊन गुजरातस्थित; पण सध्या नाशिकमध्ये राहणाऱ्या कारचालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. प्रथमदर्शनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.