दिंडोरी: नाशिक-पेठ महामार्गावरील सावळघाट परिसरात चालत्या वाहनांवर चढून मालाची लूट करणारी टोळी दिंडोरी पोलिसांनी जेरबंद केली आहे..गेल्या शुक्रवारी (ता. ५) रात्री फिर्यादीची आयशर गाडी (एमएच २१, एच ९९२२) सावळघाटात जात असताना संशयितांनी गाडीच्या ताडपत्रीवर वार करून आतील मोती साबणाचे पाच बॉक्स लंपास केले होते. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता..Nashik News : नेपाळमधील आंदोलनात नाशिकचे चार पर्यटक अडकले.पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुप्त माहितीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर पोलिस पथकांनी सुरगाणा, निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांत रवींद्र दळवी (वय २५, रा. नागशेवाडी, पो. मोहपाडा, ता. सुरगाणा), माधव शेखरे (३०, रा. सुळपाडा, ता. सुरगाणा), लालू पवार (२६) गणेश कडाळे (३२), आनंदा पवार (२२, तिघे रा. नागशेवाडी, पो. मोहपाडा, ता. सुरगाणा), दिनेश गवारे (२५, रा. करंजाळी, ता. दिंडोरी), चेतन चारोस्कर (२५, रा. गोंडेगाव, भाऊसाहेबनगर, ता. निफाड), संजय बेंडकोळी (२५, रा. लखमापूर, ता. दिंडोरी) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हे सर्व संशयित दिवसभर शेतात मजुरी करीत असत व रात्री एकत्र येऊन महामार्गावरील वाहनांवर धाड टाकून माल लुटीत असत. दिंडोरी पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरात दिलासा व्यक्त होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.