Latest Marathi News | PFIच्या दोघांना ATSकडून अटक; 20 जणांना घेतले ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maulana Saipur Rehman arrested by ATS

PFIच्या दोघांना ATSकडून अटक; 20 जणांना घेतले ताब्यात

नाशिक : वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया या संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षाला दहशतवादविरोधी विशेष पथकाने (एटीएस) मालेगावातून अटक केली असून, दुसऱ्यास नगर शहरातून ताब्यात घेतल्याचे समोर आहे. दरम्यान, एटीएसने राज्यभर छापेमारी करीत सुमारे २० जणांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. (PFI two arrested by ATS 20 people were detained Nashik crime Latest Marathi News)

पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया या संघटनेचा नाशिक जिल्हाध्यक्ष असलेला मौलाना सैपूर रहमान यास मालेगावातील हुडको परिसरातून अटक केली आहे. मौलाना रहमान यास अटक करून नाशिकच्या एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. तसेच, अहमदनगर जिल्ह्यातूनही एकाला ताब्यात घेतल्याचे समजते.

मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर, संशयास्पद कारवायांमुळे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. एटीएसने राज्यभर छापेमारी करीत सुमारे २० जणांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

पीएफआय या संघटनेवर एनआयए व ईडीकडून करडी नजर होती. त्यानुसार, संघटनेच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांविरोधात छापेमारी करून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गतच एटीएसने मालेगावातील हुडको परिसरात राहणाऱ्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष मौलाना रहमान यास गुरुवारी (ता.२२) पहाटे अटक केली. त्याचप्रमाणे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड येथेही छापासत्र सुरू असल्याचे समजते. एटीएसने या छापेमारीत सुमारे २० जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.

हेही वाचा: Bogus Medical Certificate Case : ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यांचीही होणार चौकशी

राज्यभर कारवाई

एटीएस महाराष्ट्रने गुरुवारी पहाटे केलेल्या कारवाईत औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले. त्यात मुंबई, नाशिक व औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी व कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 20 आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास सुरू आहे. आतापर्यंत 5 जणांना अटक झाली.

ATS ने पीएफआय विरोधात कारवाई करीत अटक केलेले संशयित

1 मौलाना सौफुर रहमान, मालेगाव 27

2 वशीम शेख, बीड 29

3 कय्युम शेख कोंडवा, पुणे 48

4 राझिक अहेमद खान, पुणे 31

5 मुल्ला, कोल्हापूर

हेही वाचा: शहरात 15 ठिकाणी Charging Point; Smart City कंपनीच्या माध्यमातून स्टेशन

Web Title: Pfi Two Arrested By Ats 20 People Were Detained Nashik Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..