Nashik Crime News : फुले मार्केट बनले जुगाऱ्यांचा अड्डा

Crime News
Crime Newsesakal

Nashik Crime News : भद्रकाली परिसरातील फुले मार्केट जुगाराचा अड्डा बनला असून, दिवसभर मार्केटमध्ये मटका जुगारासह विविध प्रकारचा जुगार सुरू असतो. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पोलिस ठाण्यासमोरच अशाप्रकारे जुगार सुरू असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. (Phule market in Bhadrakali area becomes gambling den nashik crime news)

नाशिककरांना खरेदीसाठी उभारण्यात आलेले पहिले मार्केट म्हणून फुले मार्केटची ओळख आहे. धन्य, मास विक्रेत्यांसह भाजीपाला, बांगड्या, जुने कपडे विक्रेते तसेच सलून अशा विविध प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी चालत असतात. जुने नाशिकसह शहराच्या विविध भागातील नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात.

अशा या पुरातन मार्केटला अवकळा आली आहे. मार्केटची दुरवस्था तर झालीच आहेच, शिवाय आत एका भागात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळली जाते. मटका जुगार खेळणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी येथे दिसून येते. त्याचा त्रास येथील व्यावसायिकांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना होत आहे. जुगार खेळत असताना अनेक जण विविध प्रकारचा नशाही करत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Crime News: धक्कादायक! चोर समजून तरुणाला जमावाची बेदम मारहाण, पोलिस ठाण्यासमोरच मृत्यू

त्यातून ग्राहकांशी तसेच व्यावसायिकांशी वाद घालण्याचे प्रकार घडतात. जुगाराचा अड्डा म्हणून सध्या मार्केटची ओळख झाली आहे. नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच नाही तर मुख्य पोलिस ठाणे समोरच अशाप्रकारे जुगार खेळविली जात असल्याने त्यांच्याकडून आश्चर्यही व्यक्त करण्यात आले.

पोलिसांनी कारवाई करत येथील जुगार बंद करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भांग, गांजा सेवन करणाऱ्यांचाही येथे मोठ्या प्रमाणावर वावर असतो. दिवसभर नशेबाज नशा येथे पडलेले असतात. तर काही नशेबाज नशा करण्यासाठी नागरिकांची लूट करण्याचाही प्रकार करत असतात. यांनादेखील आवर घालणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

Crime News
Nashik Crime : बनावट अगरबत्ती विकणाऱ्यास अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com