Plastic Ghar
sakal
पिंपळगाव (वा.) : स्वच्छता केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून नसते, तर कल्पकतेतून ती साध्य करता येते, हे फुलेमाळवाडी ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे. गावाला प्लॅस्टिकमुक्त आणि चकाचक करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या टाकाऊ पीव्हीसी पाइपाचा वापर करून प्लॅस्टिक घर (कचरापेटी) तयार केले आहे. या शून्य खर्च आणि अभिनव मॉडेलची दखल खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी घेतली असून, त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.