पंचवटी- फुलेनगर परिसरात बुधवारी (ता. २३) मध्यरात्री दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या संघर्षातून दगडफेक आणि गोळीबार झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव आणि दहशतीचं वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, संशयित अद्याप फरार आहेत.