पिंपळगाव बसवंत: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) रोजगाराच्या नवनवीन सुवर्णसंधी निर्माण होत आहेत. सायबर सिक्युरिटी, आयओटी, मल्टी-एजंट सिस्टिम्स, डेव्हऑप्स आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग यांसारख्या क्षेत्रांत लाखो नवीन नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. ‘एआय’मध्ये रोजगार संधींचा खजिना असून, ‘एआय एजंट्स’च्या प्रशिक्षणासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यक आहे, असे प्रतिपादन ॲप्लिकेशन स्क्वेअरचे सीईओ योगेश आहेर यांनी येथे केले.