Election News : 'दे धक्का!' पिंपळगावात बनकरद्वयींचे ऐतिहासिक मनोमिलन; ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का!
Sudden Political Realignment in Pimpalgaon : पिंपळगाव बसवंतमध्ये आमदार दिलीप बनकर आणि माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या मनोमिलनानंतर स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजप गटात उमेदवारांअभावी गोंधळाचे चित्र दिसत आहे.
पिंपळगाव बसवंत: राजकारण हा चाणक्यनीतीचा खेळ आहे. पिंपळगाव बसवंतच्या राजकारणात आजवर असा अनुभव अनेक निवडणुकांमध्ये आला. पण, दोन दिवसांपूर्वी आमदार दिलीप बनकर व माजी सरपंच भास्करराव बनकर यांचे मनोमिलन अनेकांना ‘दे धक्का’ ठरले.