esakal | परतीच्या पावसाने द्राक्षपंढरी हादरली; परिसरात गारपिटीसह वादळी पाऊस |Nashik Rain
sakal

बोलून बातमी शोधा

pimpalgaon baswant and kumbhari areas received heavy rains with hail

परतीच्या पावसाने द्राक्षपंढरी हादरली; परिसरात गारपिटीसह वादळी पाऊस

sakal_logo
By
माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : तालुक्याच्या उत्तर पट्यात आज सायंकाळच्या सुमारास कुंभारी परिसरात गारपिटीसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने द्राक्षपंढरी हादरली आहे. दुपारी पिंपळगाव शहर परिसरात अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली होती. उड्डाणपुलाजवळ पाणी साचल्याने त्यातून नागरिकांना जावे लागत होते.

द्राक्ष उत्पादकांच्या हंगामाने वेग घेतला असल्याने परिसरात काही दिवसांपासून द्राक्ष छाटण्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मजुरांची उपलब्धता करून बहुतेक उत्पादकांनी छाटणी पूर्ण केल्या नविन फुटव्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करून द्राक्षवेलींच्या वाढीची अवस्था जोपासत असतांना सायंकाळी तासभर वादळी वाऱ्यासह गारपिट झाली. या गारपिटीने काही भागातील द्राक्षझाडांवरील नविन फुटवा काही क्षणात उत्पादकांच्या डोळ्यासमोर जमिनीवर कोसळला. डोळ्यासमोर स्वप्न ठेऊन वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे झाडांची जोपासना केली, लाखो रूपयाचा खर्च करून तयार केलेल्या झाडांकडून दोन पैसे मिळतील हे स्वप्न अस्मानी संकटाने पुन्हा एकदा हिरावून घेतले. परिपक्व झालेल्या मका काही ठिकाणी वादळाने भुईसपाट झाला. सोयाबिनमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

हेही वाचा: नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्याशासकीय सोपस्कर पार पडतील परंतु वादळी वारा व गारपिटीने डोळ्यासमोर द्राक्षपिकाची अशी अवस्था झाल्याने वर्षभराचे नियोजन पुर्णपणे ढासळले आहे नुकसानग्रस्त उत्पादकांच्या डोक्यावर लाखो रूपयाचा कर्जांचा डोंगर वाढणार आहे
जयराम मथु जाधव
नुकसानग्रस्त द्राक्षउत्पादक कुंभारी

हेही वाचा: नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे टोलनाका होणार बंद? गडकरी सकारात्मक

loading image
go to top