Groundnut
sakal
पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत बाजार समितीत बेदाण्याचे दर सार्वकालीन ऐतिहासिक उंचीवर झेपावले आहेत. पिवळ्या बेदाण्याला सरासरी प्रतिकिलो अडीचशे रुपये एवढा उच्चांकी भाव मिळत आहे. यंदा उत्पादनात ३० टक्के घट आली आहे. सांगलीच्या हिरव्या बेदाण्याचे भाव वधारले असून परदेशासह देशांतर्गत मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम पिंपळगावच्या पिवळ्या बेदाण्याच्या दरात जोरदार तेजी आली आहे.