ATM theft
sakal
पिंपळगाव बसवंत: पिंपळगावच्या बसवंत मार्केटमधील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने तोडले आणि त्यातील २६ लाख ६० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बुधवारी (ता. १२) पहाटे साडेचार वाजता घडलेल्या या चोरीमुळे एकच खळबळ उडाली असून, चोरट्यांनी थेट पोलिस यंत्रणेला आव्हान दिले आहे.