Nashik News : माजी ग्रामपंचायत सदस्यच निघाला चोर, जिथं चोरी करायला गेले तिथं दारू पार्टी

Former Gram Panchayat Member : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बंद घरात चोरीचा प्रयत्न करताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन संशयितांना पकडण्यात आले. यातील एक संशयित माजी ग्रामपंचायत सदस्य असल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
Police detained two suspects after a burglary attempt at a locked house in Pimpalgaon Basvant.

Police detained two suspects after a burglary attempt at a locked house in Pimpalgaon Basvant.

esakal

Updated on: 

पिंपळगाव बसवंत, : पिंपळगाव बसवंत येथे गजबजलेली नागरी वसाहत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजनगरमध्ये सोमवारी (ता. २६) मध्यरात्री बंद घरात धाडसी घरफोडीचा प्रयत्न झाला. दीड लाखाची रोकड घेऊन चोरटे पसार होण्याच्या डावात असताना शेजारील नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे या चोरट्यांमध्ये पिंपळगाव ग्रामपंचायतीचा माजी सदस्य निघाल्याने शहरात खळबळ उडाली. भारत सुरेश मोगल (रा. भाऊनगर, उंबरखेड रोड, पिंपळगाव बसवंत) असे त्यांचे नाव आहे. दरम्यान, संतापलेल्या नागरिकांना संबंधितांची गावातून धिंड काढण्याची मागणी पोलिसांकडे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com