Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत
Local Vehicle Owners Protest Sudden Toll Charges : पिंपळगाव टोल नाक्यावर अचानक पूर्ण टोल आकारल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली असून लोकल पाससंदर्भातील नियम स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
सटाणा: पिंपळगाव टोल नाक्यावर अरेरावीचा कळस निर्माण झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता चारचाकी वाहनधारकांकडून थेट २३० रुपये सक्तीने वसुली तात्काळ थांबवावी; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक पास धारकांनी दिला आहे.