Family Conflict
sakal
पिंपळगाव वाखारी: नेहमीप्रमाणे सुटीचा दिवस असल्याने फारशी गडबड नव्हती. मात्र फुलेमाळवाडी व परिसरासाठी हा रविवार काळजाला भेदणारा ठरला. लोहोणेर- खालप चौफुली परिसरातील शेवाळे कुटुंबातील चौघांचा करुण अंत प्रत्येकाच्या हदयाचा ठाव घेणारा ठरला. साध्या सरळ कुटुंबात इतके टोकाचे पाऊल का उचलले गेले असावे, या विचारानेच संपूर्ण देवळा तालुका हादरून गेला. कौटुंबिक वादात कुटुंबाव्यतिरिक्त इतरांची अतिरेकी लुडबूड हेही एक कारण या मागे असल्याचे सांगितले जात आहे.