Wedding Season : लग्नसराईत पिंपळगावला होणार 25 कोटींची उलाढाल!

Wedding Season
Wedding Seasonesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : तुळशी विवाह आटोपल्यानंतर आता लग्नसराईचे दिवस सुरू होणार आहेत. चालू वर्षी आठ महिन्याच्या कालावधीत तब्बल ५७ लग्नतिथी आहेत. दोन वर्षाच्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर निर्बंध मुक्त वातावरण असल्याने एकट्या पिंपळगाव शहरात ४५० लग्न सोहळे होत आहे.

यामुळे पिंपळगावची बाजारपेठ सज्ज झाली असून लग्नसराईमुळे कपडा, सराफ बाजार, इव्हेन्ट मॅनेजमेंट, केटरर्स, मंगल कार्यालयाच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे. या सर्व लग्न सोहळ्यात पिंपळगावमध्ये तब्बल २५ कोटीची उलाढाल होणार आहे. लग्नाचा पंचवीस कोटी रूपयांचा बार दिवाळीनंतर बाजारपेठेला बूस्टर देणारा ठरणार आहे. (Pimpalgaon will have turnover of 25 crores during this Wedding Season Nashk News)

२० नोव्हेंबर नंतर लग्नाचे बार उडणार आहेत. त्यादृष्टीने बाजारपेठेत व्यापारी वर्गाकडून आवश्‍यक ती सर्व तयारी करण्यात आलेली आहे. कोरोना महामारीमुळे लागोपाठ दोन वर्षे लग्नावर आधारित सर्वच व्यवसायांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर आर्थिक चक्र पुन्हा तेजीत आले आहे.

दिवाळीच्या सण उत्सवात दमदार व्यवसाय झाल्यानंतर पिंपळगाव बाजारपेठेत व्यापाऱ्यांना लग्नसराईतही चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे. या हंगामात ५७ लग्नतिथी व पिंपळगाव शहरातील १० मंगल कार्यालये, लॉन्स बघता किमान ४५० लग्न सोहळे पार पडण्याचा अंदाज आहे. सध्याची महागाई, सोन्याची प्रतितोळ ५० हजार पर्यंत गेलेला दर पाहता मध्यवर्गीय कुटुंबातील लग्न सोहळ्याला होत असलेले सुमारे पाच लाखाचा खर्च गृहीत धरता पिंपळगाव शहरात सुमारे पंचवीस कोटी रुपयाची उलाढाल होणे शक्य आहे.

कोरोना काळात २०२१ मध्ये कोरोनाचे निर्बंध काही अंशी शिथिल झाल्याने शहरामध्ये तब्बल २९० विवाह सोहळे पार पडले होते. यामध्ये सुमारे १५ कोटी रुपयाची उलाढाल झाली होती. हा खर्च पाहता पिंपळगाव शहरात लग्नात गेल्यावर्षी पेक्षा दहा कोटीची वाढ होणार हे नक्की.

Wedding Season
YIN Arts Festival 2022 : ‘SAKAL’तर्फे उद्यापासून ‘यिन’ कला महोत्‍सव

पिंपळगाव बसवंत शहरातील लग्न सोहळे

सन विवाह उलाढाल

२०२१ २९० १५ कोटी रूपये

२०२२ ४५० २५ कोटी रूपये

"लग्नसराई सुरू होत असल्याने सोयीच्या तारखेचे बुकिंगसाठी वधु-वर पित्यांची धावपळ सुरू झाली आहे. लग्न सोहळ्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. दोन वर्षाच्या कोरोनाच्या प्रार्दुभावनंतर लग्न सोहळे उत्साहात होणार असल्याने यंदा व्यवसायाला सुगीचे दिवस येतील."

-कौस्तुभ तळेकर (संचालक, प्रमिला लॉन्स, पिंपळगाव बसवंत)

Wedding Season
Bharat Jodo Yatra : कमरेला पट्टा लावून नाशिकच्या वृंदा शेरे धावल्या ‘भारत जोडो’त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com