Students
sakal
पळसन: शिक्षणमंत्रीसाहेब आम्हाला शिकू द्या, आम्हालाही मोठे व्हायचे आहे, पण दुर्गम भाग असल्याने शेवटच्या टोकापर्यंत शिक्षक मिळत नाही, मिळेपर्यंत वर्ष संपून जाते, ही आमची परवड कधी थांबणार, असा आर्त प्रश्न करत गुजरातच्या सीमवरील पिंपळसोंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता. ९) पहाटेच चालत निघत थेट सुरगाणा गाठले. अखेर तत्काळ शिक्षक नेमण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर ते माघारी फिरले. विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने पंचायत समितीचा परिसर दणाणून गेला होता.