Theft
sakal
नाशिक: पिंपळगाव बसवंत येथील डाळिंब व्यापारी आडगाव नाका येथून पंचवटीत येण्यासाठी रिक्षातून प्रवास करीत असताना, रिक्षातून प्रवास करणाऱ्या सहप्रवासी असलेल्या दोघांनी त्यांच्याकडील पाच लाखांची रोकड असलेली बॅग मारहाण करीत हिसकावली. सोमवारी (ता. १) भरदिवसा घडलेल्या या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.