Pitru Paksha 2023 : अनेक भागात काकस्पर्श झाला दुर्मिळ; पितरांना घास देण्यासाठी स्मृतिवन उद्यानाजवळ उसळतेय गर्दी

pitru paksha 2023 people not getting crow for pind daan nashik news
pitru paksha 2023 people not getting crow for pind daan nashik newsesakal

Pitru Paksha 2023 : वाढत्या शहरीकरणाने वृक्षवल्लीही कमी झाल्या आहेत, त्याचा परिणाम म्हणजे अनेक पक्षी दुर्मिळ झाले आहेत. त्यातच पितृपक्षात मोठे महत्त्व असलेले कावळेही दिवसेदिंवस कमी होऊ लागल्याने अनेकांसाठी काकस्पर्शासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

पंचवटी स्मशानभूमीलगत असलेल्या स्मृतिवन उद्यान परिसरात अद्यापही मोठ्या संख्येने कावळे असल्याने सकाळपासून काकस्पर्शासाठी मोठी गर्दी उसळतेय. (pitru paksha 2023 people not getting crow for pind daan nashik news)

शहर परिसरातच नव्हे तर शहराच्या अनेक भागात पूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षवल्ली टिकून होती. अगदी जुन्या वाड्यांच्या परसातही अनेकांनी झाडे वाढविली होती. त्यामुळे चिमण्या, कावळे आदी पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळून येत. परंतु शहरात सोडाच परिसरातही वृक्षवल्ली घटू लागल्याने सर्वच पक्षांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

शहर व परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर वड, चिंच, आंबा, पिंपळ अशी देशी झाडे मोठ्या प्रमाणावर होती. वाढत्या नागरीकरणाने ही संख्या घटल्याने पूर्वजांना घास देण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. पूर्वी रामतीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे होती. कालौघात ही झाडे बऱ्याच प्रमाणात कमी झाली.

pitru paksha 2023 people not getting crow for pind daan nashik news
Pitru Paksha 2023 : कावळे गेले कुणीकडे, इथे नैवेद्य शिवण्यासाठी मिळतील पाळलेले कावळे

कधीकाळी प्राचीन गोदावरी मंदिराच्या छतावर कावळ्यांसाठी घास ठेवला जात होता. आता याठिकाणी वृक्षवल्ली घटल्याने काकस्पर्श दुरापास्त झाला. त्यामुळे रामतीर्थावर श्राद्धादी विधीसाठी येणारे थेट स्मृतिवन उद्याने गाठतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे टिकून असल्याने कावळ्याला घास देण्यासाठी सकाळपासून गर्दी उसळते.

कावळ्याऐवजी गाईला नैवेद्य

कावळ्यांसह सर्वच पक्षांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विशेषतः शहरी भागात काकस्पर्शासाठी मोठी कसरत करावी लागते. याला पर्याय म्हणून अनेकांनी कावळ्याएवजी गाईलाच घास देण्यास सुरवात केली आहे. अनेक ब्राह्मणाकडूनही कावळा नसेल तर गाईला नैवेद्य देण्याचा सल्ला दिला जात आहे.

pitru paksha 2023 people not getting crow for pind daan nashik news
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात श्राद्ध पूजेसाठी बनवा ही खास चविष्ट खीर, लगेच नोट करा रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com