Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण
Rising Trend of Gold Investment in Nashik : भाव वाढत असले तरी गुरुपुष्यामृत दिवशी सोने खरेदी करणारा विशेष वर्ग आहे. पारंपरिक समजाप्रमाणे पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी करू नये असा रूढी परंपरागत विचार हळूहळू बदलत असून, आता या काळातही ग्राहक सोने खरेदी करत आहेत
नाशिक: गेल्या काही वर्षांत सोन्यातून ग्राहकांना चांगला परतावा मिळाल्याने सोन्यात गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. भाव वाढत असले तरी गुरुपुष्यामृत दिवशी सोने खरेदी करणारा विशेष वर्ग आहे.