पीएम किसान लाभार्थींची ई-केवायसी अवघी २८ टक्के ई-केवायसी करीता उरले अवघे सहा दिवस

पीएम किसान लाभार्थींची ई-केवायसी अवघी २८ टक्के  ई-केवायसी करीता उरले अवघे सहा दिवस
Published on: 
सिन्नरला ई-केवायसी अवघी २८ टक्के अवघे सहा दिवस बाकी, पीएम किसान लाभार्थींची कधी सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २४ ः तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची अवघी २८ टक्के ई-केवायसी पूर्ण झाली आहे. मुदतीत ई-केवायसी न करणारे शेतकरी लाभाला मुकण्याची शक्यता आहे. दरम्यान ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३० आँक्टोबरची मुदत असून त्यासाठी अवघे सहा दिवस उरले आहेत. एकुण ४८ हजार तीन शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. यापैकी ३४ हजार ४२४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. सरकारच्या नियमांनुसार, ई-केवायसी पूर्ण नसलेल्या शेतकऱ्यांचे पुढील हप्ते रोखले जाणार आहेत. यामुळे तालुक्यातील तब्बल ३४ हजार शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण आहे. योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि केवळ पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. अनेकवेळा मुदतवाढ देऊनही अजूनही शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. परिणामी, आगामी हप्त्यांच्या वितरणावेळी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. शेतकरी पीएम-किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विनामुल्य ई-केवायसी करु शकतील. तर ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नाही, ते जवळच्या सामूहिक सेवा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतील शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडणे आणि जमीन महसूल नोंदी अद्ययावत करणेही बंधनकारक आहे. योजनेचा लाभ अखंडित सुरू राहण्यासाठी ई-केवायसी त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

PM Kisan 24th installment latest update
pm kisan samman nidhi
How to check PM Kisan installment status
PM Kisan ₹2000 installment payment status
Marathi News Esakal
www.esakal.com