Will PM Kisan installment stop without e-KYC?
esakal
सटाणा : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी केंद्र शासनाने ३० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. मात्र, पीएम किसान मोबाईल ॲप आणि पोर्टलवर सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे बागलाण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली (PM Kisan installment delayed due to e-KYC) असून असे सर्व शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.