पीएम किसान हप्ता

पीएम किसान हप्ता
Published on: 
धुळे : टुडे पान १ साठी.... -- दिवाळीपूर्वी पीएम किसान हप्ता शक्य -- जिल्ह्यातील एक लाख ५६ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २७ : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २४ वा हप्ता येत्या ३० ऑक्टोबरला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. ऐन दिवाळीपूर्वीच हा निधी हातात पडणार असल्याने जिल्ह्यातील बळीराजाला सणासुदीच्या खर्चासाठी आणि आगामी रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आर्थिक हातभार लाभणार आहे. - केंद्र शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. याअंतर्गत वितरित होणारा हा २४ वा हप्ता दिवाळीच्या पूर्वी मिळत असल्याने ग्रामीण भागात समाधान वातावरण आहे. जिल्ह्यातील एक लाख ५६ हजार पात्र शेतकरी या योजनेचा थेट लाभ घेणार आहेत. दिवाळीच्या खरेदीसह शेतीसाठी लागणाऱ्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना या निधीचा हातभार लागणार आहे. - ई केवायसी अनिवार्य निधी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे जमा होणार असल्याने कोणत्याही प्रकारचा तांत्रिक अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी आणि डीबीटी प्रणालीशी लिंक केलेले असणे बंधनकारक आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे ‘ई- केवायसी’ अद्याप पूर्ण झालेले नाही त्यांनी तातडीने ते जवळच्या सेवा केंद्रात जाऊन पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी तालुका -------------------- शेतकरी धुळे तालुका --------------- ४५,८३३ साक्री तालुका -------------- ४५,४९८ शिंदखेडा तालुका ----------- ३५,१४९ शिरपूर तालुका ------------- २९,५२० एकूण लाभार्थी ------------- १,५६,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

PM Kisan 24th installment latest update
pm kisan samman nidhi
How to check PM Kisan installment status
PM Kisan ₹2000 installment payment status
Marathi News Esakal
www.esakal.com