PNB Scam : मेहुल चोक्सी यांची मुढंगावातील जमीन जप्त

PNB Scam
PNB Scamesakal

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : पीएनबी घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने मेहुल चोक्सी व त्याच्या समूहाच्या एकूण एक हजार २१७ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्यावर आयटी विभागाने आता त्याची इगतपुरीतील मुंढेगावात असलेल्या बळवंतनगरमधील नऊ एकर २८ गुंठे बेनामी जमीन जप्त केली आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबाजवणी संचालनालय अर्थात, ‘ईडी’ने गीतांजली जेम्स समूहाच्या मेहुल चोक्सीची संपत्ती जप्त केली आहे.

चोक्सी यांच्याविरोधात रेड कॉनर्र नोटीसही जारी केली आहे. चोक्सी यांचे मुंबईमधले फ्लॅट्स, कोलकता येथील मॉल आणि हैदराबादमधील ज्वेलरी पार्क आयटी व ईडीच्या ताब्यात असून, त्यात मुंबईत १५ फ्लॅट, १७ ऑफिसचा समावेश आहे. तसेच आंध्र प्रदेश, हैदराबादमध्ये जेम्स एसईजी, कोलकतामधील शॉपिंग मॉल, अलिबागमधील फार्म हाउस आणि महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये २३१ एकर जमिनीवर टाच आणली आहे. आता आयटीने प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्जैक्शन ॲक्ट अंतर्गत बेनामीदार मेसर्स नाशिक मल्टिसर्व्हिसेस एसइझेड लिमिटेड आणि बेनिफिशियल ओनर मेसर्स गीतांजली जेम्स लि. ची मालमत्ता जप्त केली आहे. बळवंतनंगर मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील जमीन पूर्णपणे केंद्र सरकारच्या सर्व भारमुक्त निहीत असतील आणि अशा जप्तीच्या संदर्भात कोणतीही भरपाई देय असणार नाही, असे आयटीने म्हटले आहे.

PNB Scam
पोस्टात परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 'इतका' मिळणार पगार
PNB Scam
DRDO Jobs: तरुण-तरुणींनो, कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com