Nashik : नर्सिंग महाविद्यालयात आढळून आले विषारी नाग-नागिण

Pair of Indian Cobra
Pair of Indian Cobraesakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सामान्य रुग्णालय आवारातील नर्सिंग महाविद्यालयातील भांडारगृहात आढळलेले अत्यंत विषारी पाच फुट लांबीच्या नाग-नागिणची जुळण (इंडियन कोब्रा) (Indian Cobra) येथील सर्पमित्र नितीन सोनवणे याने मोठ्या परिश्रमाने पकडले. विशेष म्हणजे त्यांनी अडगळीत अंडी (Eggs) घातलेली होती. रविवारी (ता.२९) पकडलेले नाग-नागिण वन विभागाच्या मदतीने लळींग (धुळे) येथील जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोमवारी (ता.३०) सोडण्यात आले. २० ते २५ अंडी जंगलात पोषक असलेल्या ठिकाणी प्लान्ट करण्यात आली. (Poisonous Indian Cobra snakes pair found in nursing college Nashik News)

दरम्यान सामान्य रुग्णालय आवारातील नर्सिंग महाविद्यालयात विषारी साप नाग आढळून येण्याचा हा पाचवा प्रकार आहे. यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थीनींमध्ये भितीचे वातावरण आहे. नर्सिंग महाविद्यालयाला लागून मोसम नदी किनारा असल्याने हे प्रकार सातत्याने घडत आहेत. सर्प मित्रांमुळे त्यांना पकडणे सहज सुलभ झाले आहे. रविवारी दुपारी श्री. सोनवणे यांना या संदर्भात दुरध्वनी आला. नर्सिंग महाविद्यालयातील भांडार गृहात असलेल्या कपाट व त्याच्या फरशीखाली त्यांना एक नाग आढळून आला. मात्र एकपेक्षा अधिक नाग असल्याचा त्यांना संशय आल्याने त्यांनी सहकारी मित्रांना मदतीला बोलावले.

Pair of Indian Cobra
4 महिन्यांपासून कोरे रेशनकार्ड नाही; अन्न पुरवठा विभागाचा गलथान कारभार

यानंतर आपले सर्व कसब वापरुन त्यांनी अलगदपणे फरशी काढली असता त्याखालीही नाग-नागिणची जुळण मिळून आली. त्यांनी अंडीही घातली होती. यातील २० ते २५ अंडी सुरक्षित होती. फरशी काढताच ही जुळण नजीकच्या खोलीत पळाली. येथे श्री. सोनवणे यांनी दोघे विषारी नाग पकडले. दोघांची लांबी प्रत्येकी सुमारे पाच फुट होती. यानंतर अंडी व नाग-नागिण लळींग जंगलात वन विभागाच्या मदतीने सोडण्यात आली.

Pair of Indian Cobra
दीड एकरवर आधुनिक रेशीम शेती; वर्षाला 8-9 लाखांचे विक्रमी उत्पन्न

"इंडियन कोब्रा हा देशातील सर्वात विषारी व जास्त मृत्यू होणारा सर्प आहे. चार प्रमुख विषारी सर्पांपैकी एक आहे. कमी प्रमाणात आढळतो. याचा दंश जीवघेणा ठरतो. अतिशय काळजी घेऊन विषारी सर्प पकडावे लागतात. कधी ते जोखमीचे ठरते. सर्पमित्र असून नागरिकांनी त्यांना मारण्याऐवजी सर्पमित्रांना कळवावे व त्यांचे रक्षण करावे. प्राणी साखळी व जंगल वैविध्यातील सर्प एक महत्वाचा घटक आहे." - नितीन सोनवणे, सर्पमित्र, मालेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com