वनविभागाच्या जमिनीवरच होतेय गांजाची शेती; पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

crime
crimesakal

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील धुळे - नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागात गांजा हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी काही ठिकाणी वनविभागाच्या जमीनीवरच गांजाची शेती सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत साधारण ४ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात सोळा आरोपी अटक करण्यात आले आहेत.

उत्तर महाराष्ट्रात जोरदार मोहीम

पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रातील अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या दीड महिण्यात विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखऱ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवितांना पोलिसांनी चरस, गांजा आणि ब्राउन शुगरचा साठा हस्तगत केला आहे. ब्राउन शुगरचा ५०० ग्रॅम इतका साठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आंतर राज्य मार्गावरील अंमली पदार्थाच्या तस्करी सोबतच उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गांजाची शेती सुरु असून, केवळ खासगी जागेवर नव्हे तर काही भागात थेट वनविभागाच्या सरकारी जमीनीवर गांजाची शेती सुरु असल्याने वन विभागाची यंत्रणेचे कामकाज रडारवर आले आहे.

तीन शेतांवर कारवाई

नंदुरबार जिल्ह्यात तीन ठिकाणी गांजाची शेती असल्याचे पुढे आले. त्यात धडगाव तालुक्यात काही भागात कपाशीच्या शेतात गांजा लागवड केलेल्या ९ जणांना अटक केली आहे. तोरणमाळ भागात असाच प्रकार उघडकीस आला. शिरपूर (धुळे) जिल्ह्यात रॅकेटचा पदार्फाश करतांना पोलिसांना वनविभागाच्या जमीनीवर गांजाच्या शेतीचा प्रकार उघडकीस आला. वनविभागाच्या जमीनीवर गांजा लागवडीच्या आरोपावरुन पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

crime
लासलगावात कंटेनरने बस चालकला चिरडले; बस कर्मचारी संतप्त

अंमली पदार्थावर कारवाई

- मोहाडी (धुळे) - ५०० ग्रॅम ब्राउन शुगर जप्त

- धुळ्यात चाळीसगाव रोड - ६२ किलो गांजा

- रमजानपुरा (नाशिक) - ४८१ किलो गांजा

crime
जयपूरमध्ये झालेल्या तरुणीच्या हत्येचे गूढ उलगडले; मारेकरी अटकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com