निफाड तालुक्यात 3 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला आले यश

Child Marriage
Child Marriageesakal

निफाड (जि. नाशिक) : आज काळ बदलला…. शिक्षणामुळे नागरिक जागरूक झाले… मुलींच्या शिक्षणालाही तेवढेच प्राधान्य दिले जात आहे…समाजातील हे सकारात्मक चित्र असले तरी आजही अनेक कुटुंबात मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवटच सोडावे लागत आहे. त्यातून बालविवाह सारख्या घटना घडत आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. असे असतांनाही आजही बालविवाह होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. गेल्या १५ दिवसातील हा तिसरा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

नाशिक जिल्ह्यात सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या १५ दिवसांत तीन बालविवाह रोखण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण यांच्या मार्गदर्शनात तारुखेडले गावात दिनांक २४ एप्रिल २०२२ व दि.४ मे-२०२२ दोन बालविवाह तसेच महाजनपुर गावातील फड वस्तीतील २७ मे-२०२२ रोजीचा वधु व वर दोन्हीही अल्पवयीन असलेला बालविवाह रोखण्यात आले. महाजनपूर व तारुखेडले या दोन गावामध्ये अल्पवयीन बालिकेचे बालविवाह होत असल्याबाबत गोपनीय माहिती सायखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय.कादरी यांना प्राप्त झाली.

त्या नुसार सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी,पोलीस हवालदार मनोज येशी,पो हवालदार संतोष टेमघर,महिला पोलीस उर्मिला बिष्ट, पो कॉ प्रकाश वाकळे,तारुखेडले पोलीस पाटील भारत जगताप,औरंगपूर पोलीस पाटील संजय चाबुकस्वार,बालविकास अधिकारी आरती गांगुर्डे यांच्या मदतीने सदर तीन बालविवाह रोखण्यात आले.

यावेळी अधिकाऱ्यांनी मुलीच्या आई-वडिलांना मुलीचा विवाह तिचे वय १८ पूर्ण झाल्यावरच करण्याची सक्त ताकीद दिली. तसेच भविष्यात अशा पद्धतीचे कृत्य केले जाणार नसल्याचे बंधपत्रही मुलीच्या कुटुंबीयांकडून लिहून घेण्यात आले आहे.

बालकल्याण अधिकारी आरती गांगुर्डे यांनी गावातील उपस्थित नागरिकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यावर प्रबोधन व मार्गदर्शन केले. तसेच जागरुक व संवेदनशील नागरीकांनी गावात बालविवाह होत असल्यास पोलिस ठाणे किंवा पोलिस अधिक्षक कार्यालय नासिक ग्रामिण येथे संपर्क साधनेबाबत अथवा चाईल्ड हेल्पलाईन नंबर -१०९८ अथवा डायल-११२ वर बालविवाह संबधी माहिती देणेबाबत सायखेडा पो.ठाणेचे स.पो.निरी.पी.वाय.कादरी यांनी आवाहन केलेले आहे.

"बाल विवाह हा कायद्याने गुन्हा आहे.वधू- वराचे लग्न लावताना वयाची,समजतेची अट बंधनकारक आहे.आताचे बहुतांश पालक हे सजग समजले जातात मग लग्न जमावताना अरुढी परंपरांना थारा का देतात हा महत्वाचा प्रश्न आहे.दोन्ही परिवार व समाजात एकोपा कसा नांदेल याकडे लक्ष द्यावे.गावच्या पोलीस पाटलांची लवकरच यावर कार्यशाळा घेतली जाईल."

- श्री.सचिन पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रा.

Child Marriage
नाशिक : त्र्यंबक तालुक्यात रोखले 2 बालविवाह

"आताच्या काळात बालविवाह होणे चिंतेचा विषय आहे. आयुष्य घडवन्याच्या परिक्रमेत संसाराचा गाडा हाकयला लावणे म्हणजे भविष्यातील अडचणी वाढवणाऱ्या आहे.गावोगावी महिलांच्या विकासासाठी विविध व्यासपीठाद्वारे काम करत असलेल्या बचत गट,इतर अनेक संस्थांनी या विषयाकडे तितकेच लक्ष्य देऊन जनजागृती करावी."

- रुपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग

Child Marriage
बालविवाह रोखण्यासाठी SP तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन ‘परिवर्तन’! ७८ गावांवर वॉच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com