Crime
sakal
नाशिक: वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कंबर कसली आहे. शहरभर पोलिस ठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांविरोधात पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. सातपूर, इंदिरानगरपाठोपाठ नाशिक रोड, उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ऑलआउट ऑपरेशन राबवून तब्बल सव्वादोनशे टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, अवैधरीत्या सुरू असलेल्या पार्सल पॉइंटवरही पोलिसांनी धडक कारवाई केली.