नाशिक : विजपंप चोरट्यांची टोळी जेरबंद; चोरलेले १८ पंप हस्तगत

police arrested a gang of thieves who stole power pumps from wells in wavi
police arrested a gang of thieves who stole power pumps from wells in wavi SYSTEM
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : विहिरीवरील वीजपंपांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीचा वावी पोलिसांनी छडा लावला आहे. त्यांच्याकडून विविध ठिकाणाहून चोरी गेलेले १८ वीजपंप पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ग्रामरक्षक दलाच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली असून, दोघा चोरट्यांसह त्यांच्याकडून चोरीच्या मोटारी विकत घेणाऱ्या भंगार व्यवसायिकास देखील बेड्या ठोकल्या आहेत.


वावी परिसरात अनेक दिवसांपासून विहिरीवरील वीजपंप चोरीच्या घटना घडल्या होत्या. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी वीजपंप चोरी होत असल्याने चोरट्यांचा माग काढणे अवघड बनले होते. वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी ग्रामरक्षक दलाचे नुकतेच पुनर्गठन केले आहे. या दलातील सदस्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे श्री. कोते यांनी तपास केला असता कोळपेवाडी (ता. कोपरगाव) परिसरातील काही तरुणांचा या घटनेत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. रवी अबंरसिंग मुळेकर (वय ३१), निकेश अशोक कोळेकर (वय १९) या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

police arrested a gang of thieves who stole power pumps from wells in wavi
लाच प्रकरण : डॉ. वैशाली वीर-झनकरांचा कारागृहात मुक्काम वाढला

सुरवातीला माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी वावी परिसरात वीजपंप चोरी केल्याची कबुली देत बशीर फतू शेख (रा. कोळगावमाळ, ता. सिन्नर) या भंगार विक्रेत्यास पंप विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोर्चा शेख याच्याकडे वळवला. त्याच्या घरी झाडाझडती घेतल्यावर १८ विजपंपांचे सुटे केलेले भाग आढळून आले. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस उपाधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हा गुन्हा उघड केला. पोलिस उपनिरीक्षक विजय सोनवणे, पोलिस नाईक दशरथ मोरे, नितीन जगताप, पंकज मोढे, प्रकाश उंबरकर, सोपान शिंदे, गोविंद सूर्यवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.

police arrested a gang of thieves who stole power pumps from wells in wavi
नाशिक : सहा पालिकांच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यात राजकारण तापणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com