नाशिक : पोलिस ॲक्‍शन मोडमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

नाशिक : पोलिस ॲक्‍शन मोडमध्ये

नाशिक : शहरात खुनाच्या घटनांसह हाणामारी व अन्‍य गुन्ह्यांत (Crime) वाढ झालेली असताना पोलिस आता ॲक्‍शन मोडमध्ये आलेली आहे. अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी मध्यरात्री कोम्‍बिंग ऑपरेशन (Midnight Combing operation) करण्यात आले. यामध्ये हिस्ट्री शिटर, तडीपार आढळून आले असून, त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. (Police arrested History Sheeters & Criminals in Combing Operation Nashik News)

पोलिस आयुक्‍तपदाची जबाबदारी स्वीकारल्‍यानंतर आता जयंत नाईकनवरे (nashik police Commissioner Jayant Naiknavare) यांनी शहरातील गुन्‍हेगारी बीमोड करण्यासाठी पोलिस दलाला सक्रिय केले आहे. गेल्‍या काही दिवसांत गुन्‍हेगारीच्‍या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खाक्‍या दाखविताना अट्टल गुन्‍हेगारांचा शोध घेण्यासाठी कॉम्‍बिंग ऑपरेशन राबविले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्‍या आहेत, या क्षेत्रात गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले. त्यानुसार मध्यरात्री एक ते पहाटे चार या वेळेत गुन्‍हेगारांचा शोध घेण्यात आला.

हेही वाचा: नाशिक : जावयाकडून सासूचा भोसकून खून

मोहिमेत दोन सहायक पोलिस आयुक्त, २१ पोलिस अधिकारी, ११० पोलिस अंमलदारांसह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथकाने सहभाग नोंदविला होता. दरम्‍यान, यापुढील काळातही शहरात कोम्‍बिंग ऑपरेशन मोहीम राबविली जाणार असल्‍याचे पोलिस विभागातर्फे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: Nashik : इंधन दर कमी झाल्याबद्दल खाद्य पदार्थांवर 50 टक्के सूट

तीन तडीपार, रेकॉर्डवरील दहा गुन्‍हेगारांची धरपकड

कारवाईदरम्‍यान तडीपार असतानाही शहरात वावरतांना तिघांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. तसेच रेकॉर्डवरील दहा गुन्हेगारांचीही धरपकड केली आहे. जामीनपात्र व अजामीनपात्र गुन्ह्यांमध्ये पोलिस शोधात असलेल्‍या सहा गुन्हेगारांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या आहेत.

Web Title: Police Arrested History Sheeters Criminals In Combing Operation Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top