नाशिक : शहरात नाकाबंदी; तरीही दुचाक्या चोरी सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bike thief

नाशिक : शहरात नाकाबंदी; तरीही दुचाक्या चोरी सुरूच

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीला अटकाव करण्यासाठी सकाळ- सायंकाळ कडेकोट नाकाबंदी (Police Blockade) केली जात आहे. असे असतानाही दुचाकी चोरीच्या (Bike theft) घटना सुरूच असून, पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हानच उभे राहिलेले असतानाच नाकाबंदी फोल ठरतेय, अशी टीका होऊ लागली आहे. (police Blockade in city still bike theft continues Nashik crime news)

पोलिस आयुक्तालय हद्दीतील अंबड, नाशिक रोड आणि भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्या आहेत. सामनगाव रोडवरील भोर मळ्यातून बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली. योगेश भोर (रा. भोर मळा, नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी २१ जूनला सिन्नर फाटा येथील बालाजी ढाबा येथील पार्किंगमध्ये त्यांची इनफिल्ड बुलेट (एमएच- १५- एफएल- १००९) पार्क केली होती. सदर बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Nashik : सत्तांतरानंतर ‘डीपीडीसी’तील तिमाही निधीवाटप पुन्हा वादात

संतोष दातरे (रा. महेश भवनजवळ, सिडको) यांची दुचाकी (एमएच- १५- एझेड- ३४२०) सोसायटीच्या पार्किंगमधून २७ जूनच्या मध्यरात्री चोरीला गेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कडाळे (रा. राजवाडा, बेळगाव ढगा, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या २० जूनला भद्रकालीतील रसूल बाग कब्रस्तान परिसरात आले होते. या वेळी त्यांची दुचाकी (एमएच- १५- एफझेड- ८८८७) रात्री साडेदहाच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Nashik : टपाल विभागाने उचलला मुलींच्या लग्नाचा विडा

नाकाबंदी फोल?

शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे शहर पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. शहरात पोलिस ठाणेनिहाय कडेकोट नाकाबंदी लावलेली आहे. मुख्य रस्त्यांसह कॉलनी व उपरस्त्यांवरही बॅरिकेटींग करून कसून तपासणी पोलिसांकडून होते आहे. अशी नाकाबंदी असतानाही चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नाकाबंदीही फोल ठरत असल्याने पोलिसांच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: Police Blockade In City Still Bike Theft Continues Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top