Nashik Bribery Case
sakal
नाशिक
Nashik Bribery Case : Nashik : जामिनासाठी मदत करतो, २ लाख द्या; लाच घेणारे दोन PSI निलंबित, पोलीस कोठडीत रवानगी
Two Mumbai Naka Police Sub Inspectors Suspended in Bribery Case : अटकपूर्व जामिनासाठी लाच मागितल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यातील दोन उपनिरीक्षक निलंबित करण्यात आले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास सुरू आहे.
नाशिक: अटकपूर्व जामीन अर्जाला मदत करण्यासाठी दोन लाखांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल असलेले मुंबई नाका पोलिस ठाण्यातील दोन्ही उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यापासून दोघे लाचखोर उपनिरीक्षक पसार झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेले शासकीय विश्रामगृहाचे चालक बापलेकांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
