नाशिक: आगामी महापालिका निवडणूक आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आयुक्तांनी आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सात महिन्यांत १७९ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहर-जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तर गुन्हेगारांना हाताशी धरून गब्बर झालेल्या ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारांच्या ‘कुंडली’नुसार लवकरच त्यांनाही दणका देण्याचे संकेत आहेत.