Nashik Police Commissionerate : पोलिस आयुक्तालयाला मिळाली 17 नवीन वाहने
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहर पोलिस आयुक्तालय गृहविभागाकडे नवीन वाहनांसाठी मागणी करीत होते. अखेर या मागणीला अखेर यश आले असून शहर पोलिस आयुक्तालयाला नवीन सतरा वाहने प्रदान करण्यात आली आहेत.
यामुळे शहर आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांसह काही पथकांना वाहन उपलब्ध होऊन कारवाई करणे सोपे जाणार आहे. (Police Commissionerate got 17 new vehicles nashik news)
पोलिस आयुक्तालयासाठी नेहमीच वाहनांची गरज भासत असते. त्यातच वाढलेली गुन्हेगारी, गुन्हेगारी रोखण्यासाठी रात्रीची पोलिस गस्तीसाठी सातत्याने वाहने लागतात. त्यांनाही अधिकाऱ्यांसह स्वतंत्र गस्ती पथकासाठी वाहनांची आवश्यकता भासत असते.
बऱ्याचदा नादुरुस्त वाहने, वाहनांची कमतरता यामुळे पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाकडून गृहविभागाकडे नवीन वाहनांची मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
त्यासाठी आयुक्तालयाकडून पोलिस महासंचालकांमार्फत सातत्याने पाठपुरावाही केला जात होता. दरम्यानच्या काळात कोरोना प्रादुर्भावामुळे सदरची मागणी प्रलंबित होती. मात्र, गेल्या आठवड्यात गृह विभागाकडून नाशिक शहर पोलिस आयुक्तालयासाठी नवीन १७ बोलेरो उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पोलिस आयुक्तालयाला नवीन १७ वाहन मिळाली. यातील काही वाहन सहाय्यक पोलिस आयुक्त, काही वाहने पोलिस ठाण्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांना दिली जाणार आहेत. जुनी वाहने परंतु चांगली असलेली वाहने शहर गुन्हे शाखेतील पथकासाठी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या गस्तीसाठी ही अतिरिक्त वाहने उपलब्ध होणार आहेत. यामुळे शहरातील पोलिसांना मदतच होणार आहे.