Police Commissionerate : ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारींची चौकशी सुरू

police commissionerate Nashik latest marathi news
police commissionerate Nashik latest marathi newsesakal

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातंर्गत कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिस अधिकारी व २० पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी असल्याने त्यांची आयुक्तालयांतर्गत गोपनीय चौकशी सुरू आहे. या पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांविरोधात पोलिस आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या बदल्या न करता अन्यत्र जबाबदारी देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात कर्तव्यावर असताना पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कामात कसूर होत असल्याच्या घटना घडत असतात. मात्र, पोलिस आयुक्तालयाच्या विविध पोलिस ठाणे, शाखांमध्ये कार्यरत असलेल्या दोन पोलिस अधिकारी आणि २० पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात शहरातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलिस अधिकारी व गोपनीय शाखेकडून कामात कसुरी अहवाल पोलिस आयुक्तांना प्राप्त झाले होते. (Police Commissionerate Investigation of complaints against police personnel started Nashik Latest Marathi News)

police commissionerate Nashik latest marathi news
Nashik : फेम सिग्नलवर ट्रकच्या धडकेत मोपेडवरील महिला ठार

त्यानुसार,आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक आणि २० पोलिस कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारीनुसार, आयुक्तालयांतर्गत कामकाजात बदल करीत कारवाई केली आहे. या पोलिसांना नियंत्रण कक्षासह बंदोबस्त, गार्ड ड्यूटी, व्हीआयपी ड्यूटी, कैदी पार्टी आदी स्वरूपाची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त नाईकनवरे यांच्या माहितीनुसार या पोलिसांविरोधात वरिष्ठ पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच गोपनीय शाखेकडून कामात कसुरी केल्याचे अहवाल, तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.

तसेच पाहणीत काही पोलिसांनी संशयास्पद कृत्ये केल्याचे अहवाल समोर आल्याने त्यांना पोलिस ठाण्यातील जबाबदारीऐवजी इतर जबाबदारी देण्यात आल्या आहेत. एका पोलिसाची दुचाकी चोऱ्या उघडकीस आणण्यासाठीच्या पथकात तर, एकास गणेशोत्सवा दरम्यान परिमंडळीय उपआयुक्तांच्या शिफारशीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गोपनीय कामासाठी पाठविण्यात आले होते. तसेच सर्वांना प्रेषित महंमद पैगंबर जयंती बंदोबस्तासाठीही तैनात करण्यात आले होते.

कसुरी, तक्रारींची शहनिशा तसेच उघड व गोपनीय चौकशींच्या आधारे शासनाकडून सर्वसाधारण बदल्यांवरची स्थगिती उठल्यानंतर आस्थापना मंडळासमोर या पोलिसांची प्रकरणे ठेवण्यात येतील. त्यानंतर या पोलिसांना मुळ पदावर परत पाठविण्याबद्दल निर्णय होईल. पोलिस महासंचालकांनी सर्वसाधारण बदल्यांवरची स्थगिती लवकरच उठविण्यात येणार असल्याची तोंडी माहिती नाशिक भेटीवर आल्यावर दिली होती, असेही पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे.

police commissionerate Nashik latest marathi news
Nashik: शाळा परिसरात कचऱ्याचे ढीग; विद्यार्थ्यांबरोबरच रहिवाशांचे आरोग्य धोक्यात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com