नाशिक: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने पळसे (ता. नाशिक) येथे अटक केली. या वेळी पोलिसांनी संशयित दरोडेखोरांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. रवीकुमार भोई (२७, अंबरनाथ, ठाणे), शिवा विक्रम वैदू (३६, आनंदनगर, जळगाव), आकाश गोपाळ वैदू (३८, पाचोरा, जळगाव), विष्णू शंकर भोई (३०, ठाणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. या कारवाई दरम्यान श्याम विष्णू भोई हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.