Crime News : राजकीय आश्रयाला 'पोलिसी' दणका! नाशिकमध्ये आयुक्त संदीप कर्णिक यांचा गुन्हेगारीवर मोठा आघात
Nashik Police Take Strong Action Against Gang Violence : रामवाडी प्रकरणात भाजपचे पदाधिकारी सुनील बागूल यांचे पुतणे आणि सातपूरमधील गोळीबार प्रकरणात प्रकाश, दीपक व भूषण लोंढे यांच्यासह इतर संशयितांविरुद्ध अटकसत्र सुरू करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी गुन्हेगारांचे राजकीय संरक्षण उघड करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.
नाशिक: शहरातील गुन्हेगारीचे थैमान थांबविण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठा आघात सुरू केला आहे. गोळीबार, खून आणि टोळीविरोधी कारवाईत राजकीय पाठबळ असलेल्या संशयितांवर थेट लक्ष ठेवले आहे.