Nashik News: खाकीने घडविले माणुसकीचे दर्शन! प्रसूतीकळा होणाऱ्या महिलेला पोलिस वाहनातून रुग्णालयात केले दाखल

Happy Mother and Son
Happy Mother and Sonesakal

वणी : कडक आवाज, रागीट स्वभाव आणि खाकीचा धाक अशी पोलिसांची ओळख असते परंतु या ‘खाकीत’ असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं तेव्हा त्याला सलाम केल्याखेरीज राहता येत नाही.

कडक शिस्तीच्या खाकी वर्दीच्या पलीकडे देखील माणुसकी असते, पोलीस सुद्धा याच समाजाचा एक घटक आहे त्याला पण संवेदनशील मन असते याचीच प्रचिती शुक्रवार, ता. ८ रोजी पहाटे वणी - नाशिक रस्त्यावरील लखमापूर फाटा येथे घडली. (police created vision of humanity woman in labor admitted to hospital in police vehicle at wani Nashik News)

प्रसूती कळा सूरु असल्याने रुग्णालयात जाण्यासाठी वाहानाच्या प्रतिक्षेत असलेल्या मेंढपाळ महिलेला वेळीच पोलिस वाहनातून रुग्णालयात दाखल करीत माणुसकीचे दर्शन घडवले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वच स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

घटना अशी की, ता. ८ रोजी पहाटे १ वाजेचे सुमारास वणी पोलिस स्टेशन हद्दीत वणी पोलिस स्टेशनचे पोलिस व्हॅन दरम्यान लखमापुर फाटयावर जोरदार सुरु असलेल्या पावसात बंटु दामु बिचकुले रा, नांदवन, ता. साक्री, जि. धुळे व त्याची गर्भवती पत्नी संगीताबाई असे वणी व दिंडोरा बाजूकडे जाणाऱ्या वाहनाना हात देत होते.

मात्र कोणतेही वाहान न थांबता निघून जात होते, अशा वेळी पहाटे दीड वाजेच्या सुमारास वणी पोलीस ठाणेचे वाहन पेट्रोलिंग करीत असतांना महिला व पुरुष भरपावसात उभे असल्याचे बघून पोलिस वाहन चालक विजय बच्छाव यांनी वाहन थांबविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Happy Mother and Son
Success Story: ‘माझ्या पोरीनं पांग फेडले गं बाई...’ वंदना शिंदे-गायकवाड यांनी केले कुटुंबीयांच्या श्रमाचे चीज

यावेली पोलिस हवालदार पुंडलिक बागूल व बच्छाव यांनी त्यांना काय अडचन आहे बाबत विचारले असता, त्यांनी सांगितले माझी पत्नी गर्भवती असून तीला प्रसुती कळा सुरु आहेत, आम्ही दवाखान्यात जाण्यासाठी वाहनांना हात देत आहे, पण वाहान थांबत नसल्याचे सांगितले.

यावेळी गरोधर मातेची परिस्थिती बघून वणी पोलिसांनी सदर गर्भवती महिला व तिचे नातेवईक यांना वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केले. त्यानंतर एक ते दिड तासाने सदर महिलेची सुखरूप प्रसुती होऊन कन्येला जन्म दिला आहे.

वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पुंडलिक बागुल व पोलिस नायक व वाहन चालक विजय बच्छाव यांना कर्तव्यावर असतांना वेळीच मदतीचा हात देवून माणूसकीचे दर्शन घडविल्याने सदर गर्भवती महिला व तिचे बाळ यांचे प्राण वाचविल्यानेनागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

Happy Mother and Son
Nashik: ऐका...हो...ऐका, पुलाला भगदड पडल्याने रहदारी बंद! शेतीशिवारातील शेतकऱ्यांसह अनेक गावांचा संपर्क तुटला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com