नाशिक- गेल्या आठवड्यात राज्यातील पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले असता, त्यानुसार शहरातील शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर नव्याने मुंबईतील उपायुक्त योगेश चव्हाण आणि धुळ्याचे अपर अधीक्षक किशोर काळे यांची पोलिस आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली. परंतु, आठवडा उलटूनही नवीन उपायुक्त अद्यापही रुजू झालेले नाहीत. त्यामुळे फेर बदलाची शक्यता व्यक्त होते आहे. तर, आयुक्त कर्णिक यांनी आयुक्तालयांतर्गत काही फेरबदल केले आहेत.