Nashik Police
sakal
नाशिक: दिवाळीनिमित्ताने शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या, शासकीय नोकरदारांसह औद्योगिक वसाहतीलाही सुट्ट्या असल्याने या काळात अनेक जण कुटुंबीयांसह गावी किंवा पर्यटनासाठी जात असल्याने चोरट्यांना आयती संधी मिळते. त्यामुळे पोलिसांसमोर या काळात चोऱ्या-घरफोड्या रोखण्याचे आव्हान असून, ‘माझा शेजारी, खरा पहारेकरी’ या उपक्रमावर भर दिला आहे. खबरदारीसाठी शहरात गस्त वाढविण्यासह उपाययोजनांवर भर दिला आहे.