esakal | वालदेवीत विसर्जनाला येऊ नका; गणेशभक्तांना पोलिसांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Waldevi Dam Area

वालदेवीत विसर्जनाला येऊ नका; गणेशभक्तांना पोलिसांचे आवाहन

sakal_logo
By
विजय पगारे


इगतपुरी (जि. नाशिक) : नाशिकपासून जवळ असणाऱ्या वालदेवी धरणावर दरवर्षी होणाऱ्या गणेश विसर्जनाला पिंपळद येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी नाशिकमधून येणाऱ्या संभाव्य ३५ ते ४० हजार नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गणेशभक्तांनी वालदेवी धरणावर विसर्जनाला येऊ नये. शक्यतो घरच्या घरी विसर्जन करावे असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

येत्या रविवारी १९ सप्टेंबरला गणेश विसर्जन होणार आहे. वाडिवऱ्हे पोलिस ठाणे हद्दीतील वालदेवी धरण शहरापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी तेथे नाशिकमधून लहान-मोठे, घरगुती तथा सार्वजनिक ३५ ते ४० हजार गणेशभक्त विसर्जनासाठी येतात. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. पिंपळद गावाच्या हद्दीत वालदेवी धरण येत असून येथील ग्रामस्थांनी विसर्जनाला तीव्र विरोध केलेला आहे.


नाशिक शहरातील गणेश भक्तांनी वालदेवी धरणावर विसर्जनासाठी येऊ नये. विसर्जन शक्यतो घरीच्या घरी किंवा नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी करण्याबाबत शासनाच्या आदेश आणि सूचनांचे पालन करावे. जेणेकरून वालदेवी धरणांवर गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी टाळता येईल. कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून या धरणावर विसर्जनासाठी गणेश भक्तांनी येऊ नये असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात पोलिस परवानगीनंतरच लावता येणार होर्डिंग

loading image
go to top