esakal | नाशिक : तरुणाच्या खून प्रकरणी चार अल्पवयीन संशयित ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

नाशिक : तरुणाच्या खून प्रकरणी चार अल्पवयीन संशयित ताब्यात

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारगील चौकात २७ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. राहुल गवळी असे खून झालेल्या तरुणाचे युवकाचे नाव आहे.

मंगळवारी (ता. ३१) रात्री आठच्या सुमारास राहुल गवळी याचा चार अल्पवयीन संशयितांनी धारदार शस्त्रांनी वार केले. यामुळे राहुलचा जागीच मृत्यू झाला. सुरेखा राजगिरे यांचे २००९ मध्ये पप्पू राजगिरे यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांचे पतीचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर राहुल व त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्या राहुलसोबत राहत होत्या. त्याचा राग मनात धरून त्यांच्या दीरांनी राहुलला काही दिवसांपूर्वी ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यावरून अंबड पोलिसांनी संशयितांवर तडीपारीची कारवाई केली होती. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास अल्पवयीन संशयितांनी राहुल यांच्या घरात घुसून त्याच्यावर कोयत्याने डोक्यावर, मानेवर, पोटावर धारदार शस्त्राने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सुरेखा राजगिरे (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक नंदन बगाडे तपास करीत आहेत.

हेही वाचा: 'जशास तसे' उत्तर देणाऱ्या नगरसेवक शहाणेंना फडणवीसांकडून बळ

loading image
go to top