esakal | पोलिसांच्या दक्षतेने टळला अनर्थ! काच फोडून निवृत्ती लष्करी अधिकाऱ्याचा वाचविला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

police

पोलिसांची दक्षता अन् टळला अनर्थ! नाशिकमधील घटना

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : कार चालवत असताना अचानक गाडी थांबली. त्यामुळे वाहतूकही खोळंबली. पाच मिनिटे होऊनही गाडी हालत नसल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यावेळी असे काही घडले की जिवावर आलेले संकट पोलीसांमुळे टळल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ही घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली. नेमके काय घडले?

पोलिसांच्या दक्षतेने टळला अनर्थ

देवळाली कॅम्पच्या हौसन रोडवरील लोकाश्रय मिठाई या दुकानासमोर सोमवारी (ता.६) दुपारी एकच्या सुमारास निवृत्त कर्नल आर. पी. नायर हे त्यांच्या ईरटीका (एमएच १५ एचएम ७०३१) हिच्यातून जात असताना मिठाई दुकानासमोर गाडी अचानक थांबली. पाच मिनिटानंतरही गाडी हालत नसल्याने वाहतूक कोंडी होऊन गर्दी झाली. जागरूक नागरिकांनी गाडी जवळ जाऊन काचेतून डोकावून बघितले असता, वाहन चालक स्टिअरिंगवर डोके ठेवून असल्याचे दिसून आले. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन गायकवाड व मंगेश शिंदोडे यांनी तातडीने सदर बाब देवळाली कॅम्प पोलिसांना कळविली. गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक उपनिरीक्षक शामराव भोसले हे त्याच भागातून जात असताना ते थांबले. त्यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे कर्मचारी एन.एस. भुजबळ व बांगर तसेच घटनास्‍थळी काही निवृत्त कर्मचाऱ्यांसोबत गाडीतील व्यक्तीला त्रास होत असल्याचे पाहून निवृत्त जवानांच्या मदतीने गाडीची काच फोडली.

हेही वाचा: येवल्यात परंपरा खंडीत करुन शेतमालाचे लिलाव

काच फोडून निवृत्ती लष्करी अधिकाऱ्याला मदत

प्रकृती बिघडलेल्या निवृत्त अधिकाऱ्यास सामाजिक कार्यकर्ते शिंदोडे, गायकवाड, बबन काडेकर, विलास संगमनेरे, संदीप मोगल, अंबादास पाळदे, सुनील पगारे आदींच्या मदतीने लष्करी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू करीत प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. जागरूक नागरिक व पोलिसांनी वेळीच दक्षता घेत गाडीची काच फोडून आतील निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल केल्याने अनर्थ टळला.

हेही वाचा: शिपायाच्या मुलाला मिळणार नोकरी; उच्च न्यायालयाचा निकाल

loading image
go to top