Nashik Crime : बनावट 'शालार्थ आयडी' घोटाळा: नाशिक रोडचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी निलंबित; पुराव्यांशी फेरफार केल्याचा ठपका
Internal Inquiry Reveals Evidence Tampering by Inspector : शालार्थ आयडी फसवणूक प्रकरणातील पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने नाशिकचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्यावर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निलंबनाची कारवाई केली.
नाशिक: मार्चमध्ये नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल बनावट शालार्थ आयडीद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्यात तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेले अशोक गिरी यांनी पुराव्यांमध्ये फेरफार करण्याचे खात्यांतर्गत चौकशीतून उघडकीस आले आहे.