Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Ashok Kharat News: अशोक खरातविरुद्ध एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक गर्भवती महिला, हिने आरोप केला आहे की खरातने विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Nashik Police Ashok Kharat New Video

Nashik Police Ashok Kharat New Video

ESakal

Updated on

नाशिकचा कुख्यात भोंदूबाबा अशोक खरात पोलीस कोठडीत असूनही आपल्या कारवाया सोडण्यास नकार देत आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेल्या खरातने आता तपासाचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि पोलिसांची सहानुभूती मिळवण्यासाठी तुरुंगातील आपल्या भविष्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना सांगायला सुरुवात केली आहे. मात्र नाशिक पोलिसांनी ठाम भूमिका घेतली. कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. यानंतर नाशिक पोलिसांचा पॅटर्न दिसून आला आहे. त्यांनी खरातला चांगलाच चोप दिला आहे. व्हिडिओ समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com