नाशिक- भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या नाशिक पोलिस आयुक्तालयाने आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना आखल्या असून, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी लक्ष ठेवतानाच तातडीची बाब म्हणून पोलिसांच्या नव्याने दाखल रजेचे अर्ज थांबविण्यात आले आहेत..नाशिकमध्ये एचएएल, करन्सी नोट प्रेस, भारत प्रतिभूती मुद्रणालय, आर्टिलरी सेंटर, लष्कराचे गांधीनगर विमानतळ, महाराष्ट्र पोलिस अकादमी, रेल्वे इंजिन तयार करण्याचा कारखाना, लेखा भवन या महत्त्वाच्या आस्थापना आहेत. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने नाशिकचे महत्त्व अधोरेखित होते. त्याचबरोबर धार्मिक, पर्यटनस्थळ देखील आहेत. .दररोज हजारो भाविक श्री काळाराम मंदिरासह मुक्तिधाम, रामकुंड, श्री कपालेश्वर, सप्तश्रृंगी व शिर्डी येथे श्री साईबाबा दर्शनासाठी येतात. त्यामुळे धार्मिकस्थळीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यामुळे नाशिक पोलिस आयुक्तालय सुरक्षेसाठी सज्ज झाले असून आपत्कालीन परिस्थितीत दुर्घटना घडल्यास उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. .अर्ज नाकारलेभारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नव्याने रजा घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दोन अधिकाऱ्यांनी रजेसाठी अर्ज केले होते. मात्र पोलिस आयुक्तांनी रजेचे अर्ज नाकारले आहेत..पोलिसांची सतर्कतापंचवटी, तपोवन, मेन रोड, कॉलेज रोड, गंगापूर रोड, पाथर्डी फाटा, रेल्वेस्थानक परिसरात गर्दीवर लक्षजलद प्रतिसाद पथके, शस्त्रधारी अतिरिक्त सुरक्षा दल तैनातबॉम्बशोधक व बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाकडून सार्वजनिक ठिकाणी तपासणीशहराच्या प्रवेशमार्गावर नाकाबंदी, संशयित राष्ट्रविरोधी गुन्हेगारांवर कारवाईदहशतवादीविरोधी पथकाकडून विशेष मोहीम.Pune Accident : पुण्यात PMPL बसची दुचाकीला धडक; तीन मित्रांचा जागीच मृत्यू.युद्धकाळात नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस विभागाकडून लक्ष ठेवले जाते. - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.