Crime
sakal
नाशिक: द्वारका चौफुली येथील स्वागत हॉटेलमध्ये शहर गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून एमडी ड्रग्ज (मॅफेड्रॉन) विक्रीसाठी आलेल्या एका महिला व तीन असे चौघांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी शिताफीने सापळा रचत कारवाई केली असून, संशयितांकडून साडेचार लाखांचे एमडी ड्रग्जसह चारचाकी वाहन व मोबाईल असा सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.