नाशिक- शहर आयुक्तालय हद्दीमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘करडी नजर’ ठेवल्याने गेल्या अडीच वर्षांत शहर पोलिसांनी सुमारे ११ कोटींच्या अमली पदार्थांचा साठा जप्त केला. एवढेच नव्हे, तर अमली पदार्थांचे कारखाने उभारून तस्करी करणाऱ्या टोळ्याही जेरबंद केल्या आहेत.