Crime
sakal
नाशिक: शहरातील संघटित गुन्हेगारीचे जाळे मोडून काढण्यासाठी शहर पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. काही महिन्यांत विविध भागांत झालेल्या गोळीबार आणि हल्ल्यांच्या घटनांनंतर दोन प्रमुख टोळ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला जात आहे.