Crime
sakal
नाशिक: आगामी नवरात्रोत्सव, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिमंडळ एकच्या हद्दीतील अकरा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी सराईत गुन्हेगारांना दणका दिला.